जिल्ह्याविषयी संक्षिप्त माहिती

गोंदिया जिल्हा हा भंडारा जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण करण्यात आला. गोंदिया जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पुर्वेस असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़ राज्यांच्या सीमेला लागून आहे.

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1322331 आहे.पुरुष संख्या 662509 आणि स्‍त्री संख्या 659807 आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाति लोकसंख्या 355484 आणि अनुसूचित जमात लोकसंख्या 309822 आहे. जिल्ह्याचा साक्षरता दर 76.61% आहे.
हा जिल्हा अविकसीत असून येथील बराच भूभाग हा जंगलाने व्याप्त आहे. धान येथील मुख्य उत्पन्न आहे. गहू, तुर, चना, हळद, जवस सुद्धा येथे पिकविला जातो. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

जिल्ह्यात मोठया उद्योगांमध्ये अदानी समूहाचा अदानी पावर लिमीटेड तिरोडा येथे सुरु झाला आहे. छोटया उद्योगांमध्ये ब-याच संख्येने राईस मिल आहेत. धान येथील मुख्य कृषी उत्पादन असल्यामुळे गोंदिया जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे.

जिल्ह्यात गोदिया, तिरोडा, मोरगांव अर्जुनी आणि देवरी असे 4 उपविभाग आहेत. गोदिया उपविभागात 1 तालुके असून , तिरोडा उपविभागात 2 तालुके असून ,मोरगांव अर्जुनी उपविभागात 2, देवरी उपविभागात 3 तालुके असून 556 ग्रामपंचायती 954 गावे आहेत. जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, आमगाँव असे 4 विधानसभा निर्वाचन आहेत.

जिल्ह्यात 8 तालुके व 8 पंचायत समित्या असून गोंदिया व तिरोडा या दोन नगरपरिषदा आहेत वैनगंगा ही मोठी आणि प्रमुख नदी जिल्ह्यातुन वाहते. बाघ, चुलबंद, गाढवी आणि बावनथडी हया तिच्या उपनद्या आहेत


या संकेतस्थळाविषयी | नियम आणि अटी | धोरण | साईट मँप | मदत | आमच्याशी संपर्क अद्यावत अखेर ५ मार्च २०१८